
कटिहार : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्होटर अधिकार यात्रेमध्ये आज कटिहार जिल्ह्यातील मखाना उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेत संवाद साधला. मखान्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मागणी असताना, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या शेतकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. यातून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसकडून शेतकऱ्यांना साद घालण्यात येत असल्याचे या भेटीतून दिसून येते.