
काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली. सीबीआय संचालकांच्या नियुक्तीबाबत पंतप्रधान कार्यालयात बैठक सुरू आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना देखील उपस्थित आहेत.