कानपूर: ‘‘रायबरेली येथील हरिओम वाल्मिकी हे झुंडशाहीचे बळी ठरले, असून त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण देश हादरला आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राहुल यांनी नुकतीच फतेपूर येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी समाज माध्यमातून याबाबात माहिती दिली. ‘‘पीडितांच्या कुटुंबीयांना धमकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. मलाही येथे जाण्यापासून रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले,’’ असा आरोपही त्यांनी यावेळी केली.