esakal | राहुल गांधींनी दलित मुलीशी करावं लग्न; 'हम दो, हमारे दो'वरुन रामदास आठवलेंचा सल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas rahul

आपल्या भाषणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर आसूड ओढताना म्हटलं होतं की, हे सरकार 'हम दो, हमारे दो'चं सरकार आहे.

राहुल गांधींनी दलित मुलीशी करावं लग्न; 'हम दो, हमारे दो'वरुन रामदास आठवलेंचा सल्ला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील भाषणामध्ये मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. आपल्या भाषणात राहुल गांधींनी मोदी सरकारवर आसूड ओढताना म्हटलं होतं की, हे सरकार 'हम दो, हमारे दो'चं सरकार आहे. म्हणजेच मोदी-शहा यांचं अंबानी-अदानी यांच्यासाठीचं हे सरकार असल्याची घणाघाती टीका राहुल गांधींनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे. 

त्यांनी म्हटलंय की, 'हम दो, हमारे दो' हे घोषवाक्य आधी कुंटुबनियोजनासाठी वापरलं  जायचं. जर राहुल गांधींना या घोषवाक्याचा प्रचार करायचा असेल तर सर्वांत आधी त्यांनी लग्न करायला हवं. त्यांनी दलित मुलीशीच लग्न करावं आणि जाती निर्मूलनाचं महात्मा गांधींचं स्वप्न पूर्ण करावं. हे लग्न युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल. पुढे बोलताना रामदास आठवले यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन आणि हेमंत सोरेन यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील व्हावं, असंही म्हटलं. देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं.

हेही वाचा - नाही! राजदीप सरदेसाईंवर अवमाननेची कारवाई नाही; कोर्टानं दिलं स्पष्टीकरण

राहुल गांधी काय म्हणाले होते?
संसदेत 11 फेब्रुवारी रोजी भाषण करताना राहुल गांधी म्हणाले की, ‘एकेकाळी हम दो, हमारे दो ‘चा नारा दिला जायचा. मात्र आता 'हा देश फक्त चार जण चालवत आहेत. म्हणजेच 'हम दो, हमारे दो' हे सरकार चालवत आहेत. त्यांची नावं मी घेणार नाही. पण ते लोक कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे”, अशी टीका केली केंद्र सरकारवर केली होती.