Inflation : राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा; मोदींचे Daily To-Do List केले ट्विट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi and narendra modi

राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा; मोदींचे Daily To-Do List केले ट्विट

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवणे, सरकारी कंपन्यांना विकणे आणि शेतकऱ्यांना असहाय्य करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे दैनंदिन काम आहे, असे म्हणत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी (ता. ३०) महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून पंतप्रधानांवर निशाणा साधला.

पेट्रोल, डिझेल (Petrol-Diesel) आणि गॅसचे दर किती वाढवायचे, लोकांचे ‘खर्चे पे चर्चा’ कसे थांबवायचे, तरुणांना रोजगाराची पोकळ स्वप्ने कशी दाखवायची, आज कोणत्या सरकारी कंपनीला विकू आणि शेतकऱ्यांना आणखी लाचार कसे करू, असे ट्विट त्यांनी ‘पंतप्रधानांच्या रोजच्या कामांची यादी’ असे लिहून केले. बुधवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांनी वाढ करण्यात आली. नऊ दिवसांत एकूण ५.६० रुपये प्रति लीटरने वाढ झाली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर आता १००.२१ रुपये प्रति लीटरवरून १०१.०१ रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर ९१.४७ रुपये प्रति लीटरवरून ९२.२७ रुपये प्रति लीटर झाला आहे.

Web Title: Rahul Gandhi Narendra Modi Shear Daily To Do List Tweet Inflation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..