
History of Modi: राहुल गांधी यांनी बदनाम केलेले 'मोदी' गुजरातमध्ये आले कधी? 600 वर्षांपूर्वीचा भटक्यांचा इतिहास...
History of Modi: राहुल गांधी यांना काल सुरत न्यायालयाने मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तर आज लोकसभा सचिवालयाने राहुल यांची खासदारकी रद्द केली आहे.
मात्र राहुल गांधी यांच्यावर ज्या समाजाचा अवमान केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय, त्या समाजाचा गुजरातमधला इतिहास ६०० वर्षांपूर्वीचा आहे.
सर्व चोरांचं आडनाव 'मोदी' का असतं, असं विधान राहुल गांधींनी २०१९च्या प्रचार भाषणावेळी केलं होतं. याच प्रकरणात त्यांना दोषी ठरवत कोर्टाने शिक्षा सुनावली. याप्रकरणी भाजप आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी तक्रार दाखल केली होती.
मुळात 'मोदी' हे एका समुदायाचे नाव आहे. ज्यांचं मूळ भटक्या जमातीमध्ये आढळतं. या समाजाचे लोकांनी तेल गाळण्याचा व्यवसाय सुरु केला आणि ते पूर्ण गुजरातमध्ये स्थायिक झाले. मोदी आडनावाचे लोक राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड या राज्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात. (Latest Marathi News)
पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात उत्तर भारतातून हे लोक गुजरातमध्ये आल्याचं सांगितलं जातं. १९९४ मध्ये या समाजाला ओबीसींमध्ये स्थान मिळालं. या समाजाचं मूळ भटके प्रवर्गात आहे.
गुजरातच्या अनेक भागांमध्ये हे मोदी समाजाचे लोक स्थायिक झाले आणि तेलाचा व्यवसाय सुरु केला. तेलासाठी शेंगदाण्याचा आणि तीळाचा घाणा चालवणं, हा या लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. जेएनयूतील निवृत्त प्राध्यापक आणि समाजशास्त्राचे संशोधक घनश्याम शाह यांनी ही माहिती दिली. (Marathi Tajya Batmya)
तेल बनवण्याचा या लोकांचा व्यवसाय असल्याने त्यांना गुजरातमध्ये 'मोध वनिक' किंवा 'बनिया' या घटकांध्ये वर्गिकृत करण्यात आलं. हा समाज व्यवसायात स्वयंभू झाल्याने त्यांचा आर्थिक स्तर सुधारला.
गुजरातमधील लेखक अच्युत याज्ञिक यांनी सांगितलं की, मोदी समुदायाचे दोन पोटभेद आहेत. एक बनिया व्यापारी आणि दुसरी तेली-घांची भटकी जमात.
दुसऱ्या घटकातील समाजाला ओबीसींमध्ये टाकण्यात आलं. बनिया मोदी हे व्यापारी होते. सावकारकी किंवा घरगुती वस्तू विकण्याचा त्यांचा उद्योग होता.
अहमदाबादचे सामाजिक कार्यकर्ते जतीन सेठ म्हणाले की, आजचे नीरव मोदी हे जुन्या काळातील बनिया मोदींचे वंशज असावेत. त्यांनी लहान वस्तू विकण्यापासून सुरु केलेला व्यवसाय महागड्या आणि मोठ्या उत्पादनाकडे वळवला.
तरीही या समाजाकडे आर्थिक आणि राजकीय सामर्थ्य नव्हते. मात्र आता ते निर्माण झाले आहे. मोदी समूदायाचा गुजरातमधील इतिहास सहाशे वर्षांपूर्वीचा असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. 'द प्रिंट'ने याबाबचा रिपोर्ट प्रकाशित केला आहे.