राहुल यांच्याकडून जनतेची दिशाभूल - भाजप

वृत्तसंस्था
बुधवार, 28 डिसेंबर 2016

राहुल जे काही म्हणत आहेत, तो त्यांचा आततायीपणा आहे. राहुल चोरांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांवर आरोप करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. या देशाची तिजोरी कशी लुटली गेली, याचे उत्तर देशातील जनता मागत आहे.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत राहुल यांच्याकडून राजकारण करण्यात येत असून, ते जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केली आहे.

देशातील उद्योगपती 50 कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा यज्ञ केला. या यज्ञात त्यांनी गरिबांचा बळी दिला. या निर्णयापासून 50 दिवसांत देशात काहीही बदल झालेला नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

श्रीकांत शर्मा म्हणाले, की राहुल जे काही म्हणत आहेत, तो त्यांचा आततायीपणा आहे. राहुल चोरांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांवर आरोप करण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. या देशाची तिजोरी कशी लुटली गेली, याचे उत्तर देशातील जनता मागत आहे. सत्तेत असताना त्यांनी स्वीस बँक का आठवली नाही. काँग्रेसचे केजरीवालकरण झाले असून, ते सतत खोटे बोलत आहेत. 2 जी, कॉमनवेल्थ आणि हेलिकॉप्टर घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैसे कोणी खाल्ले. देशातील जनतेने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर विश्वास ठेवणे बंद केले पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi playing politics of death, says BJP