

rahul gandhi
esakal
नवी दिल्लीतील आकाशवाणी भवन परिसरात धरणे आंदोलनाला बसलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि इतर अनेक प्रमुख विरोधी नेत्यांना मंगळवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, कथित मतचोरीच्या विरोधात आणि निवडणूक प्रणालीतील अनियमिततांवरून विरोधकांनी हे तीव्र आंदोलन पुकारले होते.