NEET Protest: NEET पेपरफुटीवर राहुल गांधींचे मोदींच्या निवासस्थानासमोर आंदोलन; राहुल-प्रियांका गांधी ताब्यात

Rahul Gandhi detained during NEET protest: नीट पेपरफुटीप्रकरणी मोदी निवासस्थानासमोर काँग्रेसचे अचानक ठिय्या आंदोलन; राहुल-प्रियांका गांधींसह विरोधी नेत्यांना पोलिसांकडून ताब्यात घेऊन नंतर मुक्तता
Congress Targets Centre Over NEET Scam, Rahul Gandhi Stages Sit-in Near PM Modi's Residence

Congress Targets Centre Over NEET Scam, Rahul Gandhi Stages Sit-in Near PM Modi's Residence

sakal

Updated on

नवी दिल्ली : ‘नीट’ पेपरफुटी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनानंतर आता या मुद्द्यावर सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक पुढे सरसावले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांनी आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ या निवासस्थानाजवळ ठिय्या देत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सुमारे तीन तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी या दोघांसह काही नेत्यांना ताब्यात घेत रात्री पावणेदहाच्या सुमारास सोडून दिले. काही वेळानंतर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, तसेच अन्य खासदारही आंदोलनस्थळी जाऊन पोहोचले. यादरम्यान पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले होते. त्यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री व खासदार चरणजीतसिंग चन्नी यांचाही समावेश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com