राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या अडचणी वाढल्या; आकाशवाणी भवनातील ठिय्याप्रकरणी FIR दाखल

Rahul Gandhi Priyanka Gandhi FIR : राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशवाणी भवनात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Rahul Gandhi Priyanka Gandhi

Rahul Gandhi Priyanka Gandhi FIR

esakal

Updated on: 

Rahul Gandhi FIR: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीने मंगळवारी मोर्चा काढला. संसद भवन परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाणार होता. मात्र, पोलिसांनी मोर्चा अडवल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काही खासदार आकाशवाणी भवनात गेले. त्यानंतर दोघांनीही तिथे तब्बल आठ तास ठिय्या दिला.

अखेर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. आता याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाशवाणी भवनात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com