Rahul Gandhi
esakal
डिलिमिटेशन विधेयकावरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपाला लोकसभेच्या ८५० जागा का हव्या आहेत, असा सवाल करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघांची पुनर्रचना करून देशाचा निवडणूक नकाशाच बदलण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच विरोधकांचा प्रभाव असलेल्या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व कमी करण्यासाठी ही प्रक्रिया वापरली जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.