"लोकांच्या जीवापेक्षा मोदींना टॅक्स वसूली प्रिय"

narendra modi rahul gandhi
narendra modi rahul gandhifile photo

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. दररोज वाढणारी रुग्णसंख्या आणि अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेवरुन विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. यावरुनच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या अधिकृत खात्यावरुन राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष केलं आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून लस खरेदीवरील जीएसटी टॅक्स माफ करण्याची विनंती केली होती. पटनायक यांच्या या मागणीवरून आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

देशाताली नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान मोदी कर वसूल (GST) करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका राहुल गांधी यांनी ट्वीटमधून केली आहे. ‘जनता के प्राण जाए पर PM की टॅक्स वसूली ना जाए’, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी वरील कोट हॅशटॅग जीएसटी असं लिहित केलं आहे.

narendra modi rahul gandhi
दोन व्यक्ती करताहेत पंतप्रधानांचा वापर, काम झाल्यावर देतील फेकून - राहुल गांधी

राहुल गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र

योग्य लसीकरण धोरणाचा अभाव, कोरोनाचा फैलाव होत असताना आधीच विजयाचे केलेले अवास्तव दावे यामुळे देशातील परिस्थिती स्फोटक बनली सरकारच्या अपयशामुळे आणखी एक विनाशकारी देशव्यापी लॉकडाउन अपरिहार्य आहे, असा सल्ला कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे दिला आहे. अलीकडेच राहुल गांधींनी कोरोनाची संक्रमण साखळी तोडण्यासाठी लॉकडाउनची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सरकारच्या अपयशामुळे लॉकडाउन गरज बनल्याचा दावा केला. त

राहुल यांच्यावर पलटवार

कोरोनाच्या गैरव्यवस्थापनाला मोदी सरकारला जबाबदार ठरवत त्यांच्यावर टिकेचे आसूड ओढणारे कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर आज भाजपने पलटवार केला. जे अमेठीमध्ये साध्या आरोग्य सुविधा देऊ शकले नाही, ते पंतप्रधानांना जागतिक साथ कशी हाताळावी, याचा सल्ला देत आहेत, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्र्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी राहुल यांना लक्ष्य केले. रवी यांनी ट्विटद्वारे टीका करताना म्हटले आहे, की एक कॉमेडियन २५ लाख लोकांची सेवा करू शकला नाही, तो १३६ कोटी जनतेसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मयोगी माणसाला प्रश्‍न विचारत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com