esakal | दोन व्यक्ती करताहेत पंतप्रधानांचा वापर, काम झाल्यावर देतील फेकून - राहुल गांधी

बोलून बातमी शोधा

PM Modi}

तामिळनाडूच्या तुतूकुडी येथील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. 

दोन व्यक्ती करताहेत पंतप्रधानांचा वापर, काम झाल्यावर देतील फेकून - राहुल गांधी
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना अंबानी आणि अदानी यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. तामिळनाडूच्या तुतूकुडी येथील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले, "प्रत्येक गोष्टीचा काही ना काही उपयोग असतो, टाकाऊ काहीही नसतं. प्रश्न हा नाही की पंतप्रधान निरुपयोगी आहेत की उपयोगी आहेत. तर प्रश्न हा आहे की ते कोणासाठी उपयोगी आहेत. मी या देशातील शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, महिलांसाठी आणि तरुणांसाठी उपयोगी आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ दोन व्यक्तींसाठीच उपयोगी आहेत."

खासगी रुग्णालयांमध्ये मिळू शकणार २५० रुपयांत करोना प्रतिबंधक लस

पंतप्रधान केवळ दोन व्यक्तींसाठीच काम करतात, ते लोक 'हम दो हमारे दो' आहेत. हे दोघेही या देशाच्या पंतप्रधानाचा वापर करुन घेत आहेत. ते पंतप्रधानांचा वापर आपली संपत्ती वाढवण्यासाठी करत आहेत. माझ्या वक्तव्यावर विश्वास ठेवा जेव्हा वेळ येईल तेव्हा हे लोक त्यांना फेकून देतील. ते गरीबांच्या कामाचे नाहीत मात्र 'हम दो हमारे दो'चे खूपच कामाचे आहेत. मोदी सरकार संविधानिक संस्थांना बरबाद करत आहे. जेव्हा या संविधानिक संस्थांमधील संतुलन बिघडते तेव्हा देश अशांत होतो. गेल्या ६ वर्षात सर्व संस्थांवर व्यवस्थित प्रकारे हल्ले सुरु आहेत. 

भारतात पुन्हा वेगानं का वाढतोय कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या यामागील पाच प्रमुख कारणं

राहुल पुढे म्हणाले, "मला अतिशय दु:ख वाटत आहे की देशात लोकशाही व्यवस्था मरण पावली आहे. कारण आरएसएस ही संघटना आपल्या देशाचं संतुलन बिघडवण्याचं आणि देशाची बरबादी करण्याचं काम करत आहेत. यामुळे संसद आणि न्यायव्यवस्थेवर कोणालाही भरवसा राहिलेला नाही. मोदींवर हल्ला चढवताना राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार ईडी सीबीआयचा गैरवापर करत आहे." भाजपला हे चांगलंच माहिती आहे की मी भ्रष्टाचारी नाही त्यामुळे ते मला घबरतात, असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.