पँगॉन्ग त्सो लेकवर चीन बांधतोय पूल; मोदींची मात्र चिडीचूप: राहुल गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi

पँगॉन्ग त्सो लेकवर चीन बांधतोय पूल; मोदींची मात्र चिडीचूप: राहुल गांधी

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील संघर्ष आता पुन्हा एकदा वर आल्याचं चित्र आहे. चीनच्या कुरघोड्या दिवसेंदिवस वाढल्या असून त्याचे भारतातील राजकीय पटलावर प्रतिसाद उमटत आहेत. नववर्षाच्या औचित्याने चीनी सैन्याने भारताच्या गलवान खोऱ्यात स्वत:चा झेंडा फडकावत एकप्रकारे भारताला आव्हान देण्याचा प्रयत्नच केला आहे. चीनच्या या कृतीवर पंतप्रधान मोदी गप्प का? असा सवाल काँग्रेसने केला आहे. दुसरीकडे आता आज भारतीय सैन्याने गलवान खोऱ्यातच तिरंगा फडकावत एकप्रकारे चीनला उत्तर दिलं आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी आज मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (Line of Actual Control ) लडाखमधील पँगॉन्ग त्सो तलावावर (Pangong Tso Lake) चीन पूल बांधत असल्याची माहिती आहे. या वृत्तावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मंगळवारी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पंतप्रधानांचे मौन बधिर करणारं आहे. आमची जमीन, आमचे लोक, आमच्या सीमा अधिक चांगल्या व्यक्तीसाठी पात्र आहेत,” असं गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.

त्यांनी एका बातमीचा हवाला देऊन दावा केलाय की, चीनी लोक दोन महिन्यांहून अधिक काळ Pangong Tso तलावावर पूल बांधत आहेत. हा पूल LAC च्या अगदी जवळ आहे. हा पूल सरोवराचा उत्तर आणि दक्षिण किनारा जोडण्यासाठी आहे, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षाने आणि राहुल गांधी यांनी याआधीही चीनसोबतची ही परिस्थिती हाताळण्यावरुन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या वर्षी भारतीय सैन्य आणि पीएलए सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष देखील झाला होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiRahul Gandhi
loading image
go to top