
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेरोजगारांना रोजगार देण्याच्या अनुषंगाने ‘रोजगार प्रोत्साहन योजने’चा गवगवा केला होता. मात्र वर्ष उलटून गेले तरी ही योजना नेमकी कशा स्वरूपाची राहणार, याचा उलगडा झालेला नाही. या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेले दहा हजार कोटी रुपये परत गेले आहेत. रोजगाराच्या मुद्द्यावर मोदी किती गंभीर आहेत, हे यातून दिसून आले, असे सांगतानाच रोजगार प्रोत्साहन योजना हाही ‘जुमला’ होता काय? अशी विचारणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना उद्देशून केली आहे.