

Rahul Gandhi addresses the India Summit 2026 in Hyderabad, raising questions over the Election Commission and the validity of the 2024 Lok Sabha elections.
esakal
हैदराबाद,: ‘‘लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या १४ कोटी नागरिकांना निवडणूक आयोगाने अस्तित्वात नसलेले मतदार किंवा मतदान न केलेले मतदार ठरविले असेल, तर २०२४ ची लोकसभा निवडणूक वैध कशी मानायची,’’ असा थेट सवाल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. हैदराबाद येथे आयोजित ‘भारत समिट’मध्ये बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.