तरुणांनो, मला तुमचा अभिमान! दिल्लीतील आंदोलनावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; मोदी सरकारला दिला थेट इशारा, काय म्हणाले?

Rahul Gandhi on CJP Protest : आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
Rahul Gandhi on CJP Protest

Rahul Gandhi on CJP Protest

esakal

Updated on: 

दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) कडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, जंतरमंतरवर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. या घडामोडींवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील तरुणांचा मला अभिमान आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com