Rahul Gandhi Sakal
देश
Rahul Gandhi: बिहार ही देशातील गुन्हेगारीची राजधानी: राहुल गांधी, खेमका हत्येवरून जोरदार टीका
Bihar Has Become Crime Capital : ‘एक्स’वर राहुल गांधी म्हणाले, ‘‘बिहारमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. लूटमार, गोळीबार, खून असे प्रकार सातत्याने होत असून, कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. गुन्हेगारी येथे नियमित झाली असून, कायद्याचा धाक बसविण्यात सरकारी अपयशी ठरले आहे.
नवी दिल्ली : पाटणा येथे झालेल्या उद्योजक गोपाल खेमका यांच्या हत्येवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहार सरकारला लक्ष्य केले आहे. ‘‘बिहार ही देशातील गुन्हेगारीची राजधानी झाली आहे,’’ अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ‘एक्स’वर राहुल यांनी नितीशकुमार यांना टीकास्त्र सोडले आहे. ‘‘येत्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना खाली खेचून येथील सरकार बदलण्याची आणि राज्य वाचविण्याची गरज आहे,’’ असे राहुल यांनी रविवारी एक्सवर म्हटले आहे.