
"सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोना काळात 40 लाख भारतीयांचा मृत्यू"
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी असा दावा केला की, सरकारच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाव्हायरस साथीच्या आजारादरम्यान 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. यासह राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी केली. ट्विटरवर, राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात दावा केला आहे की भारत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सार्वजनिक करण्याबाबत डब्ल्यूएचओकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये अडकाठी करत आहे.
राहुल गांधी म्हणाले, "मोदीजी खरे बोलत नाहीत आणि इतरांना बोलू देत नाहीत, तरीही ते खोटे बोलतात की ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणीही मरण पावले नाही!" काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पुढे म्हणाले, "मी यापूर्वीही सांगितले आहे. कोविडच्या काळात सरकारच्या दुर्लक्षामुळे पाच लाख नाही तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. मोदीजी तुमची जबाबदारी पार पाडा - प्रत्येक पीडित कुटुंबाला प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई द्या."
हेही वाचा: "PM मोदी गप्प का आहेत"; 13 विरोधी पक्षांचा सरकारवर एकत्रित हल्लाबोल
भारताने शनिवारी देशातील कोरोना मृत्यू दराचा अंदाज लावण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे म्हटले की, अशा गणितीय मॉडेलिंगचा वापर भौगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या इतक्या विशाल देशात मृत्यूच्या आकडेवारीचा अंदाज लावण्यासाठी केला जाऊ शकत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी 'इंडिया इज़ स्टालिंग डब्लूएचओज़ एफर्ट्स टू मेक ग्लोबल कोविड डेथ टोल पब्लिक' या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या लेखाच्या उत्तरात एक निवेदन जारी केले होते.
हेही वाचा: "हे आरोप बिनबुडाचे"; PM मोदींवरील आरोपांवर विरोधकांना भाजपचे प्रत्युत्तर
त्या निवेदणात म्हटले आहे की देशाने अनेक प्रसंगी वापरल्या जाणार्या कार्यपद्धतीबद्दल जागतिक आरोग्य संस्थेला आपल्या अडचणी सांगितल्या आहेत. सरकारने कोरोना मृत्यूची वास्तविक आकडेवारी जाहीर केली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला असून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. रविवारी अपडेट झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चार नवीन मृत्यूंसह कोविडमुळे मृतांची संख्या 5,21,751 वर पोहोचली आहे.
हेही वाचा: चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात? पराभवानंतर चर्चेला उधाण
Web Title: Rahul Gandhi Said 40 Lakh Indians Died Due To Negligence Of The Government During Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..