चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात? पराभवानंतर चर्चेला उधाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात? पराभवानंतर चर्चेला उधाण

आज जाहीर झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. भाजप (BJP) सह नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेल्या या निवडणूकीत झालेल्या परभावाने भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. मात्र, या निवडणूकीच्या निकालानंतर चंद्रकांत पाटील यांचं प्रदेश अध्यक्षपद धोक्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

पोटनिवडणूकीच्या प्रचारादरम्यान पाटील यांनी केलेल्या विधानांचा फटका पक्षाला बसला, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची पक्षाला अडचणीत आणणारी विधाने त्यांना भोवणार का? अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठांमध्ये सुरु झाल्याची बोलले जात आहे. कोल्हापूरात हिंदूत्वाचा मुद्दा पुढे करत लढण्यात आलेल्या निवडणूकीत पराभव स्विकारावा लागल्याने, पक्षाचा हिंदूत्वाचा मुद्दा फेल ठरतोय का असा विचार केला जातोय अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

दरम्यान निकालानंतर आमचा पराभव झाला तर हिमालयात जाईन या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून त्यांना सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल केलं जात आहे, जितेंद्र आव्हाडांनी देखील यासंदर्भात एक मीम ट्विटरवर पोस्ट केली आहे. इतकेच नाही तर शिवसेनेकडून पोस्टर लावून चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला जातोय.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार? जितेंद्र आव्हाड म्हणाले, परत..

सरकार पडेल, पडणार आहे, १० मार्च नंतर पडेल, या सोबतच माझं चॅलेंज आहे , आज कोल्हापूर विधानसभेचा राजीनामा द्या आणि आज पोटनिवडणूक घ्या, निवडूण नाही आलो तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. या त्यांच्या विधानांचा फटका भाजपा पक्षला निवडणूकीत बसला का? पोटनिवडणूक असली तरी ती हिंदूत्वाच्या मुद्द्यावर लढवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे हा परभाव भाजपच्या जिव्हारी लागला असल्याचे बोलले जाते. यामध्ये या मुद्द्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे मत महत्वाचं ठरणार आहे. ते काय भूमिका घेतायत यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पराभवानंतर चंद्रकांत पाटलांना पोहचवले हिमालयात; पाहा Viral Meme's

मात्र आता पक्षाला अडचणीत आणणारी विधाने चंद्रकांत पाटील यांना भोवणार का? तसेच या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फुटणार याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. दरम्यान भाजपच्या काही नेत्यांकडून चंद्रकांत पाटील य़ांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात असल्याचे शक्याता फेटाळून लावली आहे.

हेही वाचा: काँग्रेसची प्रशांत किशोर यांना 'ऑफर', 2024 साठी मास्टर प्लानही देणार

Web Title: After Kolhapur North Election Chandrakant Patil S Post Of Bjp State President May Be Threatened

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..