मलवीय यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप; म्हणाले, प्रादेशिक अखंडतेवर... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Spotted in Nightclub
प्रादेशिक अखंडतेवर...; मलवीय यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप

मलवीय यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप; म्हणाले, प्रादेशिक अखंडतेवर...

नवी दिल्ली : नेपाळच्या काठमांडू येथील नाईटक्लबमध्ये दिसलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरुन भाजपनं त्यांना चागलंच घेरलं होतं. यावरुन आता भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी बुधवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून ज्यांनी भारताच्या प्रादेशिक अखंडतेला आव्हान दिलं अशा लोकांसोबत राहुल गांधी या पार्टीत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Rahul Gandhi seen with those who challenge India territorial integrity claims Amit Malviya aau85)

ट्विटरवरुन मालवीय यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी हे नेपाळच्या राजदुतांची कन्या सुमनिमा उदास यांच्या लग्नासाठी गेल्याचं सांगण्यात येत आहे. भारताच्या उत्तराखंडवर नेपाळनं दावा केला आहे, या मागणीला सुमनिमा यांचा पाठिंबा आहे. चीनपासून नेपाळपर्यंत राहुल गांधी यांचे अशा लोकांशी संबंध का आहेत ज्यांनी भारताच्या प्रादेशिक अखंडतेला अवाहन दिलं आहे. भाजपच्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिल्यानंतर मालवीय यांनी हा नवा मुद्दा उपस्थित केला आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर भाजपनं राहुल गांधींवर केली होती टीका

राहुल गांधी नाईटक्लबमध्ये उपस्थित असल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. यामुळं भाजपला राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करण्याची आयती संधी मिळाली होती. हा व्हिडिओ ट्विट करत मालवीय म्हणाले होते, मुंबईवर हल्ला झाला तेव्हा राहुल गांधी नाईट क्लबमध्येच होते. आता त्यांचा पक्ष अडचणीत आला असतानाही ते नाईट क्लबमध्येच आहेत. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, राहुल गांधी काय करत आहेत ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण राजस्थानच्या जोधपूरमध्ये हिंसाचार होत असताना राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळमधील नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसत आहेत. त्यांनी भारतातील लोकांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. तर सुट्टी, पार्टी, हॉलिडे, पिकनिक, खासगी टूर या गोष्टी आता देशासाठी नवीन नाहीत, असं किरेन रिजजू म्हणाले होते.