esakal | मोदींचा एकच कायदा, देश फुकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचं टीकास्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींचा एकच कायदा, देश फुकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचं टीकास्त्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र

मोदींचा एकच कायदा, देश फुकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचं टीकास्त्र

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

दररोजच्या वाढत्या पेट्रोल-डीजल आणि एलपीजी गॅसच्या किंमती आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणावरुन रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींना लक्ष केलं आहे. यामध्ये त्यांनी मोदीवर आपल्या कथित मित्रांना मदत करण्याचा आरोपही लगावला आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘‘केंद्र सरकार दिवसाढवळ्या दोन्ही हातानी लूटमार करत आहे. गॅस-डिजल-पेट्रोलवर मोठ्याप्रमाणेत करवसूली केली जाते. तसेच PSU-PSB (Public sector undertakings-पब्लिक सेक्टर बँक) बँका मित्रांना विकून जनतेची भागिदारी, रोजगार आणि सुविधा हिसकावल्या जात आहेत. पीएस मोदी यांचा एकच कायदा, देश विकून मित्रांचा फायदा! 

पेट्रोल-डिजेलच्या वाढत्या किंमतीवरुन राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. काँग्रेसनं दावा केलाय की, २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पेट्रोलिअम उत्पादनांवरील करातून २१ लाख कोटींपेक्षा जास्त रकम जमा केली आहे. काँग्रेसनं या वाढत्या किंमतीवरुन संसदेतही आवाज उठवला होता. तसेच यावर चर्चेची मागणी केली होती.

loading image
go to top