Indian Politics: शेअर बाजारातील कथित गैरव्यवहारावरून सेबीने जेन स्ट्रीटवर कारवाई केली. यावरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका करत श्रीमंतांसाठीच सरकार असल्याचा आरोप केला आहे.
नवी दिल्ली : शेअर निर्देशांकात कथितरित्या गैरप्रकार केल्या प्रकरणी नियामक संस्था भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी) जेन स्ट्रीटवर केलेल्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.