
२००४ साली डॉ. मनमोहन सिंग हे खरंतर अचानक पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यामागचे अनेक किस्से अनेक दिग्गजांनी आपापल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवले आहेत. तरी, सोनिया गांधी ज्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षानं या निवडणुका लढवल्या त्यांनी पंतप्रधान पदाला का डावललं अन् डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान कसे झाले, त्यामागे राहुल गांधींचा काय हट्ट होता? हे पाहूया.