esakal | प्रियांका कोणालाही घाबरत नाही, सत्याग्रह सुरूच राहणार - राहुल गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul and Priyanka Gandhi

प्रियांका कोणालाही घाबरत नाही, सत्याग्रह सुरूच राहणार - राहुल गांधी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात (lakhimpur kheri violence) आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहे. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी (congress leader priyanka Gandhi) यांनी घटनास्थळी जाऊन पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलं. आता एका ड्रोन कॅमेऱ्याद्वारे त्यांच्या लक्ष ठेवण्यात येत असल्याचा दावा केला जातोय. त्याबाबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींनी (congress leader Rahul Gandhi) प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा: Lakhimpur Violence| शेतकऱ्यांना चिरडलेल्या अपघाताचा व्हिडिओ आला समोर

'जिला अटक केली ती घाबरत नाही. ती खरी काँग्रेसी आहे. ती माघार घेणार नाही आणि सत्याग्रह थांबणार नाही', अशा शब्दात प्रियांका गांधींना पाठिंबा देत राहुल गांधी यांनी भाजप सरकारला इशारा दिला आहे.

लखीमपूर खेरीमध्ये नेमकं काय घडलं?

लखीमपूर खेरीमध्ये मौर्य यांचा ताफा जात असताना शेतकऱ्यांनी काळे झेंड दाखवले. त्यानंतर त्यांना दोन मोटारी शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसल्या आणि हिंसाचार झाला. त्यामध्ये एकूण आठ जण ठार झाले. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. याप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. त्यानंतर प्रियांका गांधी प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, बहुजन समाज पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा आणि भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण यांना पोलिसांनी रोखून धरलं होतं. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी या अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

loading image
go to top