नवी दिल्ली: महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या (एमपीएससी) घटनात्मक संस्थेवर कब्जा करत त्याच्या विश्वसनीयतेचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून केला. .Teachers Day Award: पगारासाठी नाही, लेकरांसाठी! 22 वर्षांच्या सेवेत अंजली गोडसे ठरल्या खऱ्या सावित्रीची लेक.एमपीएससी परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मागील काही काळापासून चालवलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत गांधी यांनी केंद्र तसेच राज्य सरकारवर शरसंधान साधले आहे..भाजप सरकारच्या काळात विद्यार्थी त्रस्त आहेत. प्रश्नपत्रिका फुटणे, भरती रखडणे, शिक्षणावरील वाढता खर्च, वसतिगृहांची दुरवस्था, निकृष्ट भोजन, थेट बँक खात्यात पैसे वर्ग करताना गडबड यामुळे विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत, असे गांधी यांनी म्हटले आहे. सरकारने आवश्यक ती पावले उचलली पाहिजेत. तसे झाले नाही तर विद्यार्थ्यांचा आवाज आणखी बुलंद होत जाईल, असा इशाराही गांधी यांनी दिला आहे..Teacher Success Story: घर सांभाळत क्लासेस, अन् त्यातून अभ्यासाची तयारी; रजिया मुलाणींची शिक्षकपदी प्रेरणादायी भरारी, जिद्द, मेहनत अन् कुटुंबाची साथ...जखमी विद्यार्थ्याची विचारपूसबिहारमधील सिवान येथे आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना भेटत गांधी यांनी त्यांची विचारपूस केली आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधात सरकारने अनावश्यक बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.