Rahul Gandhi
esakal
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्योगपतींना रोजगारनिर्मिती आणि कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत प्रश्न विचारणाऱ्या मोदींच्या वक्तव्यावर राहुल यांनी जोरदार टीका केली आहे. उद्योगपतींवर आरोप करण्याऐवजी पंतप्रधानांनी स्वतःच्या धोरणांकडे पाहावं, असं म्हणत त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.