
INDIA Alliance Rally in Patna : बिहारमधील पाटणा येथे आज(बुधवार) विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने चक्का जाम आंदोलन पुकारले होते. यावेळी निघालेल्या मोर्चादरम्यान, राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि महाआघाडीचे इतर नेते एका उघड्या ट्रकवर उभा होते. तर या ट्रकवर चढण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची धडपड अन् चढोओढ लागल्याचे पाहायला मिळाली. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्यानंतर पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनीही ट्रकमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण पप्पू यादव यांना ट्रकमध्ये चढू देण्यात आले नाही.
पप्पू यादव यांना ट्रकमध्ये चढण्यापासून रोखल्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यानंतर पप्पू यादव तेथून निघून गेला. केवळ पप्पू यादवच नाही तर कन्हैया कुमारलाही ट्रकमध्ये चढू देण्यात आले नाही. या दोघांनाही सुरक्षारक्षकांकडून सर्वांसमक्ष अपमानित व्हावं लागलं आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यावर जोरदार चर्चा सुरू आहेत.
पप्पू यादव यांनी दोनदा स्टेजवर चढण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली लोटले. तर कन्हैया कुमार यांनाही ट्रकवरील स्टेजवर जाऊ दिले नाही. अखेर त्या दोघांनाही मागे हटावे लागले. या घटनेमुळे महाआघाडीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, कारण पप्पू यादव आणि कन्हैया कुमार सारख्या नेत्यांना दुर्लक्षित करण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पटना येथील मोर्चादरम्यान राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न होत आहे. निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे.
यावेळी तेजस्वी यादव म्हणाले, 'कोणत्या बिहारींना मतदान करायचे आणि कोणाला नाही हे दोन गुजराती ठरवतील का?' मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, गरिबांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जात आहेत, मोदी-नितीश यांची ही गुंडगिरी चालणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.