Congress Municipal Elections : काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार? ; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे संकेत!

Prithviraj Chavan : जाणून घ्या, राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत काय दिली आहे प्रतिक्रिया?
Senior Congress leader Prithviraj Chavan addressing media, giving strong hints about contesting upcoming municipal elections independently.
Senior Congress leader Prithviraj Chavan addressing media, giving strong hints about contesting upcoming municipal elections independently. esakal
Updated on

Prithviraj Chavan's Big Political Hint Ahead of Municipal Elections : महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर, काँग्रेसची पुढील भूमिका काय असणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष स्वतंत्रपणे महापालिका निवडणुका लढवेल, असे संकेत दिल्याचेसमोर आले आहे. 

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "जर काँग्रेसने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मुंबई आणि राज्यातील इतर महापालिका निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांना आश्चर्य वाटणार नाही."

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, "काँग्रेस पक्षाची भूमिका अशी आहे की आमची युती आमच्या इंडिया अलायन्समधील सहकारी पक्षांसोबत आहे – (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्ष.) जर त्यांना इतर कोणत्याही पक्षासोबत, समविचारी पक्षासोबत उप-युती करायची असेल तर ती त्यांची बाब आहे."

Senior Congress leader Prithviraj Chavan addressing media, giving strong hints about contesting upcoming municipal elections independently.
Raj Thackeray : राज ठाकरेंचा मनसैनिकांना स्पष्ट अन् कडक आदेश; म्हणाले, ‘’मला विचारल्याशिवाय…’’

याशिवाय पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंकडे इशारा करत म्हटले की, "जर आघाडीतील भागीदारांना काँग्रेसच्या विचारसरणीला, धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीला आणि आंबेडकरांनी संविधानात लिहिलेल्या विचारसरणीला मूलभूतपणे विरोध करणाऱ्या लोकांशी युती करायची असेल तर आम्ही ते स्वीकारणार नाही."

ते म्हणाले की, यापूर्वीही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या आहेत आणि काँग्रेस पक्ष निवडणूक समितीने जर मुंबई, पुणे, नागपूर येथील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यास मला आश्चर्य वाटणार नाही.

Senior Congress leader Prithviraj Chavan addressing media, giving strong hints about contesting upcoming municipal elections independently.
Nitish Kumar Announcement : बिहार निवडणुकीआधी नितीश कुमारांनी टाकला मोठा डाव; विरोधकांचं वाढणार टेन्शन?

सुमारे २० वर्षांनंतर ५ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर दिसले होते.  या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन्ही भावांसोबत दिसल्या, परंतु काँग्रेस पक्ष या कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे दिसून आला.  काँग्रेस आणि मनसेमध्ये बराच वादही आहे.

याशिवाय, मंगळवारी काँग्रेसचे कार्यकर्ते मनसेच्या मोर्चापासूनही अलिप्त राहिल्याचे दिसून आले. मात्र याममध्ये मनसेसोबत शिवसेना उद्ध बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते दिसून आले. आतापर्यंत मविआच्या तिन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढवलेल्या आहेत. परंतु, आता राज ठाकरे यांच्या प्रवेशामुळे मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com