Congress : काँग्रेस आमदारावर भ्याड हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, हल्ल्यानंतर वाहनांची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tribal leader Anant Patel

'तू आदिवासींचा नेता होत आहेस, आम्ही तुला सोडणार नाही.'

Congress : काँग्रेस आमदारावर भ्याड हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, हल्ल्यानंतर वाहनांची तोडफोड

गुजरातमधील नवसारी (Gujarat Navsari) इथं काँग्रेस आमदार (Congress MLA) आणि आदिवासी नेते अनंत पटेल (Tribal leader Anant Patel) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर लोकांमध्ये संताप आहे. या घटनेवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही ट्विट केलंय.

राहुल गांधींनी ट्विटमध्ये लिहिलंय, गुजरातमधील पार-तापी नदीजोड प्रकल्पाविरोधात आदिवासी समाजासाठी लढणारे आमच्या पक्षाचे आमदार अनंत पटेल यांच्यावर भाजपनं (BJP) केलेला भ्याड हल्ला निषेधार्ह आहे. हा भाजप सरकारचा राग आहे. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचंही ते म्हणालेत.

हेही वाचा: Amit Shah : ..त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं; अमित शहांनी सांगितला 'किस्सा'

या घटनेनंतर आमदाराच्या समर्थनार्थ जमाव रस्त्यावर उतरला आणि गोंधळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा आमदार अनंत पटेल यांच्या समर्थकांनी एका दुकानाला आग लावली. त्याचवेळी अग्निशमन दलाचं वाहन घटनास्थळी पोहोचलं असता, त्याचीही तोडफोड करण्यात आलीय.

हेही वाचा: मुसलमान सर्वात जास्त कंडोम वापरतात, लोकसंख्या कुठं वाढतेय? ओवैसींचा भागवतांना थेट सवाल

ही घटना नवसारी जिल्ह्यातील खेरगाम शहरातील आहे. काँग्रेसचे आमदार आणि आदिवासी नेते अनंत पटेल यांनी आरोप केला की, मी शनिवारी एका सभेसाठी नवसारीच्या खेरगाम इथं पोहोचलो असता, तिथं जिल्हा पंचायतीचे प्रमुख आणि त्यांच्या गुंडांनी माझ्या कारची तोडफोड केली आणि मला मारहाण केली. या वेळी हल्लेखोरांनी 'तू आदिवासींचा नेता होत आहेस, आम्ही तुला सोडणार नाही', अशी धमकी दिल्याचा आरोप आमदारानं केलाय. या हल्ल्यात आमदाराच्या डोक्याला दुखापत झाली. त्याचवेळी या घटनेनंतर आमदाराच्या समर्थनार्थ आंदोलकांचा मोठा जमाव जमला. आंदोलकांनी एका दुकानाला आग लावली आणि घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाची तोडफोड केली. पार-तापी-नर्मदा नदीजोडण्याच्या प्रकल्पाला विरोध करून आमदार अनंत पटेल प्रसिद्धीच्या झोतात आले होते.