Congress: लिंगायत समाजासाठी राजकीय समीकरणे बदलणार? राहुल गांधींची मुरूगा मठाला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi

लिंगायत समाजासाठी राजकीय समीकरणे बदलणार? राहुल गांधींची मुरूगा मठाला भेट

चित्रदुर्ग : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील श्री मुरूगा मठाला भेट दिली आहे. त्यामुळे लिंगायत समाजासाठी राजकीय समीकरणे बदलणार का याकडे लक्ष लागलेले आहे. राहुल गांधी यांनी भेट दिलेला मुरूगा मठ हा लिंगायत समाजासाठी मोठं श्रद्धास्थान मानला जातो म्हणून राजकीय वर्तुळात बदल होऊ शकतात.

(Rahul Gandhi Visit Shri Murugha Math)

कर्नाटकमध्ये सध्या भाजपचे सरकार सत्तेत असून काँग्रेस आपला मतदार वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. त्याचबरोबर काँग्रेच्या नेतृत्वाबद्दल पक्षामध्ये अंतर्गत वाद सुरू असताना राहुल गांधी यांनी या मठाला भेट दिली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या कर्नाटक दौऱ्यावर असून येणाऱ्या विधान सभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बांधणी आणि वाढीसाठी राहुल गांधी प्रयत्न करणार असून या दौऱ्यातील मुरूगा मठाला दिलेली भेट कर्नाटकमध्ये राजकीय बदल घडवणार का? याकडे लक्ष लागलेले आहे.

Web Title: Rahul Gandhi Visit Murugha Math In Karnataka Lingayat Community

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..