Rahul Gandhi : राहुल यांची स्वराज आश्रमाला भेट

स्वराज आश्रमाला मोठा इतिहास लाभलेला आहे
राहुल गांधी
राहुल गांधीsakal

तापी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान गुजरातमधील बार्डोली येथील स्वराज आश्रमात जाऊन लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले. राहुल यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काही काळ वेळ काढत स्वराज आश्रम येथे जाऊन सरदार पटेल यांनी अभिवादन केले. ‘‘ अन्यायाविरुद्ध आणि शेतकऱ्यांना व कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या या न्याय यात्रेदरम्यान येथे आल्याने आम्हाला प्रेरणा मिळाली’’ असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले.

राहुल गांधी
Hair Care Tips : हेअर स्टायलिंग आणि कलरिंगमुळे केसांची चमक गेलीय? मग, 'या' नैसर्गिक हेअर मास्कचा करा वापर

राहुल यांची भारत जोडो न्याय यात्रा ही चार दिवसांचा गुजरात दौरा आटोपून आज सुरत येथे दाखल झाली असून एका दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी ही यात्रा महाराष्ट्रातील नंदूरबार येथे दाखल होणार आहे, अशी माहिती रमेश यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

बार्डोली सत्याग्रहाचा साक्षीदार

स्वराज आश्रमाला मोठा इतिहास लाभलेला आहे. या आश्रमाची स्थापना सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली होती. या आश्रमातूनच बार्डोली सत्याग्रहाची सूत्रे हलविण्यात येत होती. महात्मा गांधी यांचेही १९३६ ते १९४१ या कालावधीमध्ये काही काळ या आश्रमात वास्तव्य होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com