चंडीगड: ‘‘हरियानाचे पोलिस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषी व्यक्तीवर कारवाई करणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे हा दलितांसाठी आत्मसन्मानाचा मुद्दा आहे,’’ असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना अटक करावी, असेही आवाहन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना केले.