Rahul Gandhi
esakal
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणूक प्रक्रियेत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. गोव्यातील मडगाव येथे एका सभेला संबोधित करताना त्यांनी मतचोरीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. देशात नेमकं काय सुरू आहे, हे आता जनतेपासून लपून राहिलेलं नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.