Congress Raises Questions on Voter List Integrity :राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतांचा चोरी होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. यावेळी त्यांनी पुरावे म्हणून काही कागदपत्रंही सादर केली. महत्त्वाचे म्हणजे पाच मार्गांनी मतांची चोरी होत असल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.