
Rahul Gandhi
sakal
नवी दिल्ली : ‘‘भारतात लोकशाही प्रणालीवर चौफेर हल्ला होत आहे. भारतात १६-१७ भाषा, विविध धर्म, परंपरा आहेत. त्यांची जोपासना अन् अभिव्यक्तीला वाव देणे देशाच्या हितासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. चीनसारखी दडपशाही अन् हुकूमशाही भारतात चालू शकत नाही,’’ असे मत काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोलंबिया येथे बोलताना व्यक्त केले.