'26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी दिल्लीत पार्टी करत होते' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यात 15 देशांतील 166 लोकांचा मृत्यू झाला.

'26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते'

26/11 Mumbai Terror Attack : भारतीय जनता पक्ष (BJP) आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय (Amit Malviya) यांनी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्यानिमित्तानं काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधलाय. एका वृत्तपत्राची बातमी शेअर करत त्यांनी गांधींवर टीका केलीय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, 'जेव्हा 26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते, हे विसरणार नाही.' असं त्यांनी नमूद केलंय. ही वर्तमानपत्राची कात्रण दरवर्षी 26/11 च्या निमित्तानं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते. या अहवालानुसार, मुंबईतील हल्ल्यानंतर लगेचच राहुल गांधी दिल्लीतील एका पार्टीत दिसले होते, असं नमूद आहे.

2008 मध्ये 26 नोव्हेंबरला मुंबईवर मोठा दहशतवादी (Mumbai Attack 2008) हल्ला झाला होता. यात 15 देशांतील 166 लोकांचा मृत्यू झाला, तर 300 हून अधिक लोक जखमी झाले. हा हल्ला भारतीय इतिहासातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जातो. त्याचवेळी 1 डिसेंबर 2008 रोजी 'मेल टुडे'वर प्रसिद्ध झालेल्या या बातमीत असं सांगण्यात आलंय, की मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आईचे अश्रू सुकले नव्हते आणि राहुल गांधी लगेचच एका फार्महाऊसवर मित्रांसोबत पार्टी करताना दिसले. दिल्ली रिपोर्टनुसार, राहुल गांधी त्यांचा मित्र समीर शर्माच्या संगीत समारंभात गेले होते, असं बातमीत म्हंटलंय.

हेही वाचा: कसाबला जिवंत पकडून ओंबळेंनी पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणला होता

पाकिस्तानचे 10 दहशतवादी समुद्रामार्गे मुंबईत आले आणि त्यांनी अनेक ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून हा हल्ला केला. मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि छत्रपती शिवाजी टर्मिनससह अनेक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चार दिवस चकमक सुरू होती. या हल्ल्यात 18 सुरक्षा जवान शहीद झाले होते. देशभरातून या शूर शहिदांना नमन केले जात आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

मुंबई हल्ल्याच्यानिमित्तानं राहुल गांधी यांनीही ट्विट करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिलीय. राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, सीमेवरील कठीण वातावरणात सैनिक कुटुंबापासून दूर राहून देशाचं रक्षण करतात. दहशतवादीसारख्या हल्ल्यात आपला जीव धोक्यात घालून निष्पापांना वाचवतात. हा कुटुंबाचा, गावाचा, देशाचा अभिमान आहे, असा माझ्या देशाचा तरुण आहे. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील वीरांना विनम्र अभिवादन. जय हिंद!', असं त्यांनी ट्विट केलंय.

loading image
go to top