Rahul Gandhi 295 : Exit Poll नंतर राहूल गांधींनी सांगितलेला सिद्धू मुसेवाला कोड नक्की काय आहे?

या बैठकीनंतर महायुतीतील सर्व पक्ष 295 जागांवर विजयाचा दावा करत आहेत
Rahul Gandhi 295
Rahul Gandhi 295esakal

Rahul Gandhi 295 :

लोकसभा निवडणूक 2024 साठीचे सर्व टप्पे पूर्ण झाले आहेत. उद्या म्हणजे 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी Exit Poll ही जाहीर करण्यात आला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये NDA (National Democratic Alliance) जास्त जागांवर विजयी होईल असे सांगण्यात आले आहे. या Exit Poll ला विरोधी पक्षांनी खोटा पोल असल्याचे सांगितले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना एक्झिट पोलबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हा 'फँटसी पोल' असल्याचे सांगितले. एक्झिट पोलबाबत त्यांनी दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (sidhu moosewala) याच्या गाण्याचा संदर्भ देत  इंडिया आघाडीला 295 जागा मिळणार असल्याचे स्पष्ट केले. शनिवारी घेतलेल्या मिटींगमध्ये ते कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

Rahul Gandhi 295
Kolhapur Exit Poll Results : 'एक्झिट पोल'मुळे उत्सुकता शिगेला; लोकसभा निकालावर ठरणार जिल्ह्याचं राजकीय समीकरण

दिल्लीत भारत आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीनंतर महायुतीतील सर्व पक्ष 295 जागांवर विजयाचा दावा करत आहेत. काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, सार्वजनिक सर्वेक्षणाच्या अभ्यासानुसार, आम्हाला 295 जागा मिळत आहेत. रविवारी राहुल गांधींनीही 295 जागांवर विजयाची मोहोर लागेल असे सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिद्धू मूसवाला यांच्या 295 हे गाणे ऐकण्यास कार्यकर्ते आणि नेत्यांना सांगितले. पहिली गोष्ट म्हणजे राहुल गांधींनी 295 जागांवर विजयाचा दावा केला आहे. असा लोकांचा विश्वास आहे. गाण्याचा अर्थ समजून घेतल्यावर त्याचा दुसरा अर्थ समजू शकतो.

Rahul Gandhi 295
Rahul Gandhi on Exit Poll: "सिद्धू मुसेवालाचं गाणं ऐकलंय का?..."; राहुल गांधींची एक्झिट पोलवर पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?

काय आहे 295 गाणे

सिद्धू मुसेवालाची अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. त्याचे 295 हे गाणेही त्यापैकी एक आहे. हे पंजाबी गाणे असून त्याच्या ओळी अशा आहेत,

‘बता बेटा, तेरा सिर’ नीचे क्यों है, तू अच्छा भला हॅंसता रहता था, आज मौन किस लिए है, आज तो दरवाजे पर बोर्ड उठाकर घुम रहे हैं, मै अच्छी तरहा से जानती हू ये कोन है.

मूसेवालाच्या गाण्यात 295, 295 हा फक्त एक आकडा नाही. खरे तर या गाण्याचे बोल आहेत ‘धर्म दे नाम ते वाद मिलुगी’. 'सच बोलेगा तन मिलू 295 जे करेगा तरक्की पुट ही मिलुगी'. त्याचा हिंदीत अर्थ असा आहे की धर्माच्या नावावर वाद होतात.

जिथे तुम्ही खरे बोलता तिथे कलम 295 लावले जाते. प्रगती केली तर इथे द्वेष मिळेल, हे गाणं निराश झालेल्या लोकांना नवी उर्जा देते. त्यामुळेच राहूल गांधी यांनीही हे गाणं ऐकण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.

तिसऱ्यांदा एनडीए सरकार स्थापन करण्याच्या एक्झिट पोलच्या दाव्यावर काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, एक्झिट पोलचा डेटा कोणीही मान्य केलेला नाही. जेव्हा पत्रकार आमच्याशी ऑफ रेकॉर्ड बोलतात तेव्हा ते म्हणतात की हे आश्चर्यकारक आहे, असे होऊ शकत नाही.

 जर संपूर्ण देश सहमत नसेल तर आम्ही का मान्य करायचे? हे सट्टा बाजारासाठी, शेअर बाजारासाठी केला गेलेला Exit Poll आहे,असेही ते म्हणाले.

Rahul Gandhi 295
Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

सिद्धूचा मृत्यू आणि हे गाणं

सिद्धू मूसेवालाच्या गाण्याचे शीर्षक 295 होते आणि जर आपण त्यांच्या मृत्यूची तारीख पाहिली तर ती 29-5-2022 म्हणजेच 29 मे होती. इतकंच नाही तर सिद्धूने 14 दिवसांपूर्वीच द लास्ट राइड हे गाणं रिलीज केलं होतं. या गाण्याचे मुखपृष्ठ सिद्धूची हत्या झालेल्या गाण्यासारखेच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com