
२०२४ मध्ये राहुल गांधीच देणार मोदींना टक्कर; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे मोठे विधान
कॉग्रेससचे नेते सध्या राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रा करत आहेत, यादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधी हेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूकीत फक्त विरोधकांचा चेहरा असतील असे जाहीर केले आहे. इतकेच नाही तर राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचा चेहरा देखील असतील असेही म्हटले आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी विरोधकांचा चेहरा असू शकतात का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाल उत्तर देताना कमलनाथ म्हणाले की, 2024 च्या निवडणुकांचा प्रश्न आहे, तर राहुल गांधी केवळ विरोधकांचा चेहराच नव्हे तर पंतप्रधान पदाचा चेहरा देखील असतील.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जगाच्या इतिहासात कोणत्याही व्यक्तीने 3500 किलोमीटरपेक्षा जास्त पायी प्रवास केलेला नाही. भारत देशासाठी जेवढे हौतात्म्य गांधी घराण्याने दिले आहे तेवढे कोणत्याही कुटुंबाने दिलेले नाही. राहुल गांधी सत्तेचे राजकारण करत नाहीत. तो जनतेचे राजकारण करतात आणि जो जनतेचं राजकारण करतो, त्याला जनता आपोआप सिंहासनावर बसवते.असे कमलनाथ म्हणाले आहेत.
हेही वाचा: Small Saving Rate Hike : सरकारकडून नववर्षाचं मोठं गीफ्ट! तुमच्या बचतीवर मिळणार घसघशीत व्याज
मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी सांगितले की, जेव्हा भारत जोडो यात्रा तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक मध्ये होती तेव्हा भाजपने दुष्प्रचार केला की महाराष्ट्रात यात्रा फेल ठरेल. पण जेव्हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालं तेव्हा हिंदी भाषीक पट्ट्यात समर्थन मिळणार नाही असे म्हणाले पण मध्यप्रदेशात भारत जोडो यात्रेने सर्वा रेकॉर्ड मोडीत काढले.
तसेच कमलनाथ म्हणाले की, सर्वांनी पाहिले की राजस्थान आणि त्यानंतर दिल्लीत राहुल गांधी यांच्या यात्री किती लोकप्रीय ठरली, मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रसचे कार्यकर्ते भारज जोडो यात्रेत सहभागी झाले नाहीत, तर सामान्य जनचा खासकरून तरूणानी यात्रेत उत्साहाने सहभाग घेतला.
हेही वाचा: Cobra Viral Video : किंग कोब्रावर झाडल्या गोळ्या अन् नागराजाने गेमच केला