esakal | लक्षद्वीप संकटात! राहुल गांधींचं PM मोदींना पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi-Pm-Modi

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांना पत्र लिहून लक्षद्वीपमध्ये (Lakshwadeep) लागू करण्यात येत असलेल्या नव्या सुधारणा मागे घेण्याची मागणी केली आहे.

लक्षद्वीप संकटात! राहुल गांधींचं PM मोदींना पत्र

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांना पत्र लिहून लक्षद्वीपमध्ये (Lakshwadeep) लागू करण्यात येत असलेल्या नव्या सुधारणा मागे घेण्याची मागणी केली आहे. मुस्लीम बहुल असलेल्या केंद्रशासित प्रदेशात प्रशासक प्रफुल पटेल यांनी मद्य विकण्यास परवानगी दिली आहे. तसेच बीफ खाण्यावर बंदी आणली आहे. प्रशासकाच्या या नव्या नियमांमुळे लक्षद्वीपमधील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याच पार्श्वभूमीर राहुल गांधी यांनी पीएम मोदींना पत्र लिहलं आहे. (Rahul Gandhi writes to PM Modi sharad pawar demands withdrawal new Lakshadweep reforms)

राहुल गांधी यांनी पत्रात म्हटलंय की, लक्षद्वीपमधील नव्या कोरोना नियमांमुळे तेथे विषाणूचा संसर्ग वाढला आहे. अनेक कंत्राटी कामगारांना कामावरुन काढून टाकण्यात आलं आहे. प्रशासनाने मच्छीमारांची पारंपरिक पद्धत धुळीस मिळवली आहे. राहुल गांधींनी सरकारवर टीका करताना म्हटलंय की, 'प्रशासनाने आणलेले नवे नियम लोकशाहीची मूळं उद्धवस्त करणारे आणि शांतता खराब करणारे आहेत. लक्षद्वीपच्या लोकांना विकास हवा आहे, पण सरकार त्यांना दुसऱ्या मार्गावर नेत आहे'.

हेही वाचा: लक्षद्वीप काश्मीरच्या मार्गावर, आरोपात तथ्य किती? प्रफुल पटेल कोण?

शरद पवारांनीही मोदींकडे केली मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लक्षद्वीप प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांचा विरोध केलाय. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे नव्या सुधारणा मागे घेण्याची मागणी केली आहे. नव्या सुधारणांमुळे लक्षद्वीपमधील लोकांची पारंपरिक जीवन पद्धती आणि संस्कृती पूर्णपणे बदलेल, असं शरद पवार म्हणाले आहेत. लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीचे मोहम्मद फैजल हे एकमेव खासदार आहेत.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

प्रफुल पटेल यांना हटवण्याची मागणी

मागील वर्षी डिसेंबरमध्ये लक्षद्वीपचा प्रशासक म्हणून जबाबदारी घेतलेले प्रफुल पटेल यांची कारकीर्द वादग्रस्त ठरत आहे. प्रफुल पटेल लक्षद्वीपचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी नव्याने आणलेल्या काही सुधारणांमुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. अनेक लोक रस्त्यावर उतरुन निदर्शने करत असून पटेल यांना पदावरुन हटवण्याची मागणी करत आहेत. अँटी-सोशल अॅक्टिविटीज बील-2021, गुंडा अॅक्ट अशा नव्या सुधारणांना लोकांचा विरोध आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीतही मोठे बदल केले जात असून दोन पेक्षा अधिक मुले असणाऱ्या उमेदवारांना यापुढे निवडणूक लढवता येणार नाही. मुस्लीम बहुल असलेल्या लक्षद्वीपमध्ये मद्य परवाने देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच बीफ बॅन करण्यात आले आहे.

loading image
go to top