esakal | राहुल गांधी यांच्या कार्यालयावर स्थानिक प्रशासनाचे छापे; मदत साहित्याची तपासणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Office

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयावर काल (ता. १९) रविवारी रात्री स्थानिक प्रशासनाकडून छापा टाकण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील मदत साहित्याची तपासणी करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या कार्यालयावर स्थानिक प्रशासनाचे छापे; मदत साहित्याची तपासणी 

sakal_logo
By
पीटीआय

अमेठी (उत्तरप्रदेश) - काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातील जनसंपर्क कार्यालयावर काल (ता. १९) रविवारी रात्री स्थानिक प्रशासनाकडून छापा टाकण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांकडून कार्यालयातील मदत साहित्याची तपासणी करण्यात आली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या घटनेमुळे आता राजकारण चांगलेच तापले असून काँग्रेसकडून स्थानिक भाजप खासदार आणि केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांना लक्ष्य करण्यात आले आहे. तर, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला या छाप्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. तहसीलदार, काही अधिकारी आणि पोलिसांचे संयुक्त पथक सुरुवातीला गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयात गेले. यानंतर या पथकाने राहुल गांधी यांच्या जनसंपर्क कार्यालयात जात तेथील मदत साहित्याची तपासणी केली. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांची चौकशी केली. यानंतर हे पथक माघारी परतले असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. 

यानंतर काँग्रेसकडून स्मृती इराणी यांच्यावर टीका होत असून स्मृतीजी तुम्ही मोठी चूक करत आहात. स्वत: तर आपल्या मंत्रालयाकडून अमेठीला काही दिलं नाही, जर राहुल आणि प्रियांका मदत करत आहेत तर अधिकाऱ्यांकडून छापे टाकले जात आहेत. अमेठीची जनता काँग्रेससाठी कुटुंबीयांप्रमाणे आहे. हे सामान त्यांच्यासाठी असल्याचे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि आमदार दीपक सिंह यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही यावर टीका करताना म्हटले आहे की, प्रशासनाने वॉरंट नसताना राहुल गांधी यांच्या कार्यालयावर छापा टाकला. कदाचित राहुल गांधी आणि काँग्रेसकडून अमेठीतील जनतेला केली जाणारी मदत योगी सरकारच्या पचनी पडली नसेल, असे सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

loading image