
अरारिया (बिहार): ‘बिहारमधील विशेष मतदारयादी फेरपडताळणीच्या (एसआयआर) नावाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार (एनडीए) मते चोरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आम्ही मते चोरू देणार नाही,’ असा इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी दिला. बिहारमधल्या मतदार अधिकार यात्रेत संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला.