ट्विटवर सध्या एकच ट्रेंड #RahulChallengesModi

टीम ई-सकाळ
Tuesday, 13 August 2019

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानानंतर ट्विटवर सध्या #RahulChallengesModi हा एकच ट्रेंड सुरु आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानानंतर ट्विटवर सध्या #RahulChallengesModi हा एकच ट्रेंड सुरु आहे. 

याबाबत काँग्रेसच्या नेत्या शर्मा मोहम्मद यांनी ट्विट केले, की पंतप्रधान मोदी हे राहुल गांधी यांनी दिलेले चर्चेचे आव्हान कधीही स्वीकारणार नाहीत. पण भाजपने राहुल गांधींना जम्मू काश्मीराला भेट देण्याचे आव्हान स्वीकारले आहे. 

दरम्यान, काश्मिरमध्ये तुम्ही बोलावले आहे, याचे स्वागत करतो. पण, तुम्ही आम्हाला मुक्तपणे फिरण्याची, नागरिकांना भेटण्याची आणि जवानांशी संवाद साधण्याची परवानगी देणार आहात का, असा प्रश्न काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी काश्मिरच्या राज्यपालांना केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RahulChallengesModi is now Twitter Trend