रायबाग : रिक्षाचालक असलेल्या तरुणाचा चाकूने वार करून खून (Rickshaw Driver Case) करण्यात आल्याची घटना कुडची (ता. रायबाग) येथे शुक्रवारी (ता. २०) रात्री उघडकीस आली. यासीन राजेसाब जार्तकर (वय २२, रा. कुडची) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित जाधव असे या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याचे नाव असून, तो स्वतःहून पोलिसांत हजर झाला आहे.