
Fake Crowd Videos Railway Stations
ESakal
भारतीय रेल्वे आता खोडसाळ घटकांविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. रेल्वेशी संबंधित दिशाभूल करणारे व्हिडिओ शेअर करणाऱ्या सोशल मीडिया हँडलवर कारवाई करण्याची योजना भारतीय रेल्वे प्रशासनाने आखली आहे. सणासुदीच्या काळात काही सोशल मीडिया हँडल जुने किंवा दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करून प्रवाशांमध्ये गोंधळ आणि असंतोष पसरवत होते.