Indian Railway Instructions: रेल्वे ट्रॅकच्या बाजूला 'H' का लिहिलेला असतो?

कधी नोटीस केलं आहे का की रेल्वेच्या या ट्रॅकच्या बाजूला H का लिहिलेला असतो? भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी
Indian Railway Instructions
Indian Railway Instructionsesakal

Railway Knowledge: सगळ्यात रोमांचक प्रवास म्हणजे रेल्वेचा (Indian Railway). अनेकांना रेल्वेचा करणं खूप आवडतो. त्यात रुळांची भन्नाट रचना खरंच कशी काम करते याबाबत सगळ्यांनाच संभ्रम असतो. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की रेल्वेच्या या ट्रॅकच्या बाजूला H का लिहिलेला असतो? भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी २४ तास काम करते. या २४ तासात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रत्येक क्षणी विशेष लक्ष दिले जाते. त्यासाठी रेल्वेनेही मजबूत यंत्रणा सज्ज केली आहे. (what is meaning of H sign on Railway Track?)

Indian Railway Instructions
Indian Railway Instructionsesakal

ऑटोमेशनच्या युगातही काही अधिकारी-कर्मचारी केवळ रेल्वेचे कामकाज सुरक्षितपणे सुरु आहे की नाही, याकडेच लक्ष देतात. यासाठी अनेक प्रकारची चिन्हे आणि सूचनाफलकांचा वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला रेल्वे ट्रॅकच्या बाजूला दिसणार्‍या 'H' या चिन्हाबद्दल सांगणार आहोत. (indian railway signs information)

Indian Railway Instructions
Railway : रेल्वेच्या मराठीकरणासाठी मराठीजन एकवटले

नक्की कोणासाठी असतं हे चिन्ह?

Indian Railway Instructions
Indian Railway Instructionsesakal

हे चिन्ह मुख्यतः लोको पायलेटसाठी असतं. लोको पायलेट म्हणजे रेल्वे चालवणारा चालक. या चालकाला लोको पायलेट असं म्हणतात. हा लोको पायलेट रेल्वे चालवण्याचे आणि त्या चालत्या रेल्वेत कोणतीही अडचण येऊ नये कोणताही अपघात होऊ नये यासाठी काम करतो. (What is work of Loco Pilot)

Indian Railway Instructions
India Railway च्या नियमांत मोठा बदल, आता लोअर बर्थ फक्त या प्रवाशांसाठीच राखीव असणार

H या चिन्हाचा अर्थ (Instructions for Loco Pilot)

Indian Railway Instructions
Indian Railway Instructionsesakal

ट्रेनच्या स्टेशनवरची अनेक चिन्हे ही फक्त रेल्वे चालकासाठी अर्थात लोको पायलटसाठी वापरले जातात. ही चिन्हे लोको पायलटला रेल्वे चालवतांना मदत करतात. 'H' चिन्ह देखील यापैकी एक आहे. हे चिन्ह केवळ लोको पायलटसाठी आहे. याचा वापर 'थांबा' दर्शविण्यासाठी केला जातो.

Indian Railway Instructions
Indian Railway: तिकीट कन्फर्म नसतानाही करू शकता ट्रेनने प्रवास? जाणून घ्या नियम

लोकल पॅसेंजर ट्रेनसाठी वापरला जातो (Precautions for local train)

Indian Railway Instructions
Indian Railway Instructionsesakal

हे सामान्यतः लोकल पॅसेंजर ट्रेनच्या ऑपरेशन प्रक्रियेत वापरले जाते. पॅसेंजर ट्रेनला डेस्टीनेशनकडे नेणाऱ्या लोको पायलटना 'H' चिन्ह पाहून समजते की पुढे थांबा आहे. हे 'एच' चिन्ह स्टेशनपासून काही अंतरावर किंवा एक किलोमीटर अंतरावर लावले जाते.

Indian Railway Instructions
Indian Railways : खुशखबर ! ट्रेन तिकिट कॅन्सल झाल्यावर मिळणार १०० टक्के रिफंड

हे चिन्ह खूप महत्वाचे आहे (railway track signs and instructions)

Indian Railway Instructions
Indian Railway Instructionsesakal

हे चिन्ह पाहून लोको पायलट ट्रेनचा वेग कमी करतात. H म्हणजे थांबा. हे हाल्ट स्टेशन कोणत्याही गावासाठी किंवा शहरासाठी बनवले जातात. या हाल्ट स्टेशनवर सर्व गाड्या थांबत नाहीत. या स्थानकांवर काही निवडक गाड्या काही विलंबाने थांबतात. आपत्कालीन परिस्थितीत एक्स्प्रेस गाड्या या हाल्टवर थांबतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com