

बिहारच्या आरा रेल्वे स्थानकात मंगळवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झालाय. तरुणाने बापलेकीवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना घडलीय. आरा रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडालीय. तिसऱ्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. तसंच गोळीबाराचं आणि हत्येचं कारणही समोर आलेलं नाही.