रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता; विमानतळाच्या धर्तीवर अतिरिक्त शुल्क आकारणी?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

कोरोनामुळे बंद करण्यात आलेली रेल्वेसुवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान, आता रेल्वे प्रवास येत्या काही दिवसांमध्ये महाग होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - सध्या कोरोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वसामान्यांसाठी बंद आहे. गेल्या आठवड्यात एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. कोरोनामुळे बंद करण्यात आलेली रेल्वेसुवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. दरम्यान, आता रेल्वे प्रवास येत्या काही दिवसांमध्ये महाग होण्याची शक्यता आहे. मोठ्या रेल्वे स्टेशनवरून रेल्वेत बसणाऱ्या प्रवाशांसाठी स्टेशन युजर फी लागू केली जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त झी न्यूजने दिले आहे. विमानतळांकडून यूजर डेव्हलपमेंट फी आकारली जाते. त्याच धर्तीवर रेल्वेसुद्धा असं पाऊल उचलणार असल्याचं म्हटलं जात आहे. विमानतळावर प्रवाशांकडून युडीएफ शुल्क म्हणून 281 रुपये आकारले जातात. रेल्वेसुद्धा तिकिट बुकिंगसह प्रवाशांकडून स्टेशन युजर फी आकारण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तिकिटाची किंमत वाढेल.

रेल्वे मंत्रालय डिसेंबर अखेर स्टेशन युजर फी लागू कऱण्याची शक्यता आहे. मात्र हे शुल्क तेव्हाच आकारता येईल जेव्हा रेल्वे स्टेशन रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत प्रायव्हेट कंपन्या नुतनीकरण करतील आणि अधुनिक रुपडं देतील. ज्या रेल्वे स्टेशन्सचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत विकास केला जात आहे त्यामध्ये मुंबई, जयपूर, हबीबगंज, चंदीगढ, नागपूर, बिजवासन, आनंद विहार यांचा समावेश आहे. या मोठ्या रेल्वे स्टेशनवरून रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना युजर डेव्हलपमेंट फी द्यावी लागू शकते. 

हे वाचा - वाहनधारकांना दिलासा! ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर कागदपत्रांबाबत सरकारचा मोठा निर्णय

सरकार रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत अधुनिक आणि प्रवाशांसाठी जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिपनुसार प्रोजेक्ट केले जात आहे. इथं खाजगी कंपन्यांना लिलाव प्रक्रियेद्वारे रिडेव्हलपमेंटचं काम दिलं जातं. या बदल्यात खाजगी कंपन्या रेल्वे स्टेशन्सवर कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि स्टेशन युजर फीच्या माध्यमातून कमाई करेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी लिलाव प्रक्रिया सुरु झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway will impose new charge on big railway stations