C V Ananda Bose Controversy
C V Ananda Bose Controversy

C V Ananda Bose : पश्‍चिम बंगालच्या राज्यपालांवर राजभवनमधील महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळाचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

C V Ananda Bose Controversy : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजभवनमध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या २९ वर्षांच्या तरुणीने राज्यपाल बोस यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली आहे.
Published on

कोलकता : पश्‍चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांच्याविरोधात राजभवनमधील महिला कर्मचाऱ्याने लैंगिक छळाचा आरोप करीत पोलिसांकडे गुरुवारी (ता.२) तक्रार दाखल केली आहे. राज्यपालांनी हा आरोप फेटाळून लावत अशा कथित आरोपांना घाबरत नसल्याचे सांगितले. राज्यातील हिंसाचार आणि भ्रष्टाचाराविरोधात मी उभारलेला लढा कोणी थांबवू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजभवनमध्ये कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या २९ वर्षांच्या तरुणीने राज्यपाल बोस यांच्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार केली आहे. राज्यपालांनी दोनदा लैंगिक छळ केल्याचा दावा तिने तक्रारीत काल केला आहे. २४ एप्रिल रोजी अशी घटना घडली होती. त्यानंतर काल पुन्हा बोस यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे. बायोडेटा घेऊन राजभवानातील कार्यालयात राज्यपालांनी तिला बोलावले होते. तेथे त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. राजभवनात तैनात पोलिसांकडे तिने सुरुवातीला तक्रार केली. त्यांनी तिला पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. पोलिसांनी संबंधित महिलेची ओळख गोपनीय ठेवली आहे.

C V Ananda Bose Controversy
Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

राज्यपालांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. राजभवन कोलकता या नावाने ‘एक्स’वर काल रात्री केलेल्या पोस्टवर सत्याचा विजय होईल, असे राज्यपालांनी म्हटले आहे. ‘अशा कथित आरोपांना मी घाबरत नाही. माझी बदनामी करून कोणाला निवडणुकीचा फायदा घ्यायचा असेल तर देव त्यांचे भले करेल. पण बंगालमधील भ्रष्टाचार आणि हिंसाचाराच्या विरोधातील माझा लढा ते थांबवू शकत नाहीत,’ असे उत्तर त्यांनी दिले आहे.

या प्रकरणावरून तृणमूल काँग्रेसने राज्यपालांवर टीका केली आहे. बंगालच्या अर्थमंत्री चंद्रमा भट्टाचार्य म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकीकडे ‘नारीशक्ती’वर बोलतात तर दुसरीकडे राज्यपाल महिलांचा अपमान करीत आहेत.

बंगालच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक भूमीवर अशा घटना घडत आहे. ही घटना अत्यंत गंभीर, भीतीदायक आणि लज्जास्पद आहे.
- सागरिका घोष, राज्यसभा सदस्य, तृणमूल काँग्रेस

संदेशखालीच्या घटनेवरून आणि भ्रष्टाचारावरून लक्ष हटविण्यासाठी अशा प्रकारचे बिनबुडाचा आरोप करण्यात येत आहे.
तथागत रॉय, भाजप नेते

C V Ananda Bose Controversy
Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्यायी मार्ग?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com