
इंदौरमधून हनीमूनसाठी शिलाँगला गेल्यानंतर बेपत्ता झालेल्या राजा रघुवंशीची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी आता त्याची पत्नीच हत्याकांडाची मास्टरमाईंड असल्याचा खुलासा झालाय. तिने तीन मारेकऱ्यांना सुपारी दिली होती त्यांनीच मेघालयात राजा रघुवंशीची हत्या केली. सोनम रघुवंशीसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिघेही मध्य प्रदेशातील इंदौरचे असल्याची माहिती समोर आलीय.